Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगावच्या शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा एल्गार! दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी ठिय्या आंदोलन.

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगावच्या शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा एल्गार! दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी ठिय्या आंदोलन.

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 1 views23 Sept 2026#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील स्मार्ट सर्विसेस लिमिटेडच्या सुमारे ३५० सफाई कर्मचारी आणि वॉर्ड बॉय यांनी दोन महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. थकीत पगार तातडीने द्यावा, तसेच दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत नियमित वेतन मिळावे, अशी प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात आंदोलन करत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, नियमित पगार मिळण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचारी आणि वॉर्ड बॉय यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या आंदोलनानंतर प्रशासन आणि संबंधित कंपनी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगावातील स्थानिक बातम्या, ताजे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा jalgaon.com आणि सबस्क्राईब करा! #jalgaon #news #newsupdate #jalgaonnews #viral

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs