Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

मुंबईत ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७’ प्रदर्शनाचे आयोजन!

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

मुंबईत ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७’ प्रदर्शनाचे आयोजन!

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 772 views•31 Oct 2026•#Jalgaon#Podcast#Shorts

भारतीय प्लास्टिक उद्योगाला जागतिक स्तरावर नवी संधी उपलब्ध करून देणारे ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. २१ ते २५ जानेवारी २०२७ दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे प्लास्टिक व्यापार प्रदर्शन ठरण्याचा मान या प्रदर्शनाला मिळणार असल्याची माहिती अध्यक्ष जयेश खिमजी रांभिया यांनी दिली. यावेळी रवींद्र लड्ढा, विनोद बियाणी आणि महेंद्र रायसोनी उपस्थित होते. जागतिक तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री आणि व्यवसायाच्या नव्या संधींसाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. #PlastivisionIndia2027 #PlasticIndustry #Mumbai #BusinessNews #JalgaonDotCom

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs