Jalgaon Logo
@jalgaondotcomcheck_circle
24.5K subscribers
Subscribe

जळगावात गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची तुफान गर्दी; बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ! #jalgaon

#Jalgaon#MarathiPodcast#Shorts
Glimpse

जळगावात गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची तुफान गर्दी; बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ! #jalgaon

Jalgaon Logo
jalgaondotcomcheck_circle
🔔 Subscribe
YouTube
👁 269 views21 Sept 2026#Jalgaon#Podcast#Shorts

जळगाव शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण आले असून, गणेश देखावे पाहण्यासाठी आणि लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने शहरातील विविध गणेश मंडळांच्या देखाव्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः नेहरू चौक येथील गणेश मित्र मंडळ, नेहरू चौक मित्र मंडळ तसेच नवी पेठ परिसरात गणपती दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, आकर्षक गणेशमूर्ती आणि विविध देखावे पाहण्यासाठी नागरिकांसह महिला, लहान मुले आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सुट्टीचा दिवस आणि गणेशोत्सवाचा उत्साह यामुळे जळगाव शहरातील गणेश मंडळांच्या परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असून, संपूर्ण शहर गणेशमय झाल्याचे चित्र दिसत आहे. #jalgaon #news #newsupdate #jalgaonnews #jalgaondotcom #viral

Show more ↓
TourismNGOBlogDirectoryClubs